Sunday, November 7, 2021

या देशात मुलींची संख्या जास्त आहे ...

 एक असा देश जाची लोकसंख्या आहे १४कोटी ४३ लाख जी कि आपल्या महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा कमीच असेल पण हा देश जगतील सर्वात मोठा देश आहे याबद्दल एक लेख मी अगोदरही लिहिलेला आहे पण एका पोस्ट मध्ये लिहिता येईल. इतका छोटा हा देश नाही त्यामुळे मी घेऊन आलोय पार्ट -२ आजचा हा लेख जगतील सर्वात मोठा देश रशियाबद्दल आहे आणि मला खात्री आहे कि लेख वाचल्यावर आपल्याला रशियात जावेसे वाटेल.आम्ही रशियावर आणखी एक लेख लिहिला आहे जो आपल्याला या लेखाच्या शेवटी मिळेल .



  1.  १४कोटी ४३ लाख लोकसंक्या असलेला हा देश क्षेत्रफळाने जगात पहिला आहे आणि इथे रशियन भाषा राष्ट्रीय भाषा आहे पण इथे इंग्र्जीसोबतच फ्रेंच आणि जर्मन भाषा देखील बोलल्या जाते.
  2. भारताचे चलन जसे रुपया आहे तसेच रशियाचे रशियन रुबल आहे आणि हे भारतातील १.०४ रुपयाच्या बरोबर आहे .
  3. रशिया देश हा प्लुटो ग्रहापेक्षाही मोठा आहे.हा देश युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडात आहे येथील ७७% लोकसंख्या युरोपच्या भागात राहते आणि उरलेली २३% लोकसंख्या हि आशियातील भागात राहते.
  4. येथील एक शहर सेंट पीटर्सबर्गला वेनिसच्या नावाने देखील ओळखतात .याला वेनिस ऑफ रशियाही संबोधले जाते.
  5. इटलीतील वेनिस शहरात ४०० ब्रिज आहेत पण आपल्याला जाणून आश्चर्य होईल कि रशियात १००० पेक्षाही जास्त ब्रिज आहेत.जे कि इथला नद्यांवर बनलेले आहेत.
  6. जगातील सर्वात रेल्वेलाईन रशियातच आहे.जिला अन्ससायबेरीयन रेल्वे असेही म्हणतात.९२९९कि मी मध्ये पसरलेले हे रेल्वेलाईन युरोपमधील शहर मॉस्को पासून आशियापर्यंत येते.
  7. हि गोष्ट ऐकून तर आपण विचारातच पडाल कि जिथे भारतात मुलांना मुली मिळत नाहीत तिथे रशियात मात्र मुलींची संख्या मुलांच्या पेक्षा जास्त आहे.इथे मुलांच्या तुलनेत ९,००,००० मुली जास्त आहे.इथे मुलीना लग्जनासाठी लवकर मुलगी मिळत नाही.आपले लग्न होत नसेल तर नक्की रशियाला जा म्हणजे आपल्याला एकतरी मुलगी मिळेल.
  8. भारतातल्या लोकांना अंधश्रद्धाळू म्हंटल्या जाते. आपल्या इथले शिक्षित लोक समाजातील या प्रथांची टीका करतात पण आता ऐका रशियातील लोकही खूप अंधश्रद्धाळू आहेत.इथल्या लोकांचे असे म्हणणे आहे कि कुत्राच्या पंजाला जर कुरुवाळले तर लवकर श्रीमंती येते.रशियात आज जरी हि प्रथा नसली तरी काही काळापूर्वी नवीन घरात प्रवेश घेण्यापूर्वी मांजरीला घरात सोडल्या जायचे याचे कारण असे कि त्यांचे असे मानणे होते जो कोणी घरात प्रथम प्रवेश करेल तो प्रथम मरणार म्हणून आता  भारतालाच अंधश्रद्धाळू म्हणणे  बंद करायला पाहिजे.
  9. मित्रानो इथे एक हार्मीटरस  नावाचे एक म्युझिअम आहे. जे कि जगातील मोठ्या आणि जुन्या म्युझियम  पैकी एक आहे. ज्याला १७६४ मध्ये कॅथरीन द ग्रेट ने बनवले होते.आजच्या काळात या म्युझिअममध्ये ३०,००,००० इतक्या ऐतिहासिक वस्तू आहेत.एका वस्तूला जर आपण २ मिनिटाचा वेळ लावला  तरी   सर्व वस्तू पाहायला तब्बल ६ वर्षे लागतील. ते हि थोडेपण न थांबता यावरूनच आपल्याला अंदाज लागेल कि हे म्युझिअम केवढे मोठे आहे.
  10. पूर्ण जगातील पिण्याजोगे स्वच्छ पाणी जगातील जवळपास २०% पाणी फक्त रशियाच्या बायकल तलावात आहे.
  11. ऐकायला थोडे विचित्र वाटते पण इथले भालू जेट फ्युलचा नशा करताना दिसतात खूपवेळा असेही पाहिल्या गेले कि भालूनी  विमानतळावर जाणून जेट फ्युलचा वास घेऊन नशा केला.
  12. आजही रशिया जगातील एक महासत्ता बनून आहे. याचे एक कारण म्हणजे रशियाकडे ८३०० पेक्षाही जास्त अनुबॉम्ब आहेत आणि आजही मनात आले तर रशिया १० पेक्षा जास्त वेळा पूर्ण जगाला नष्ट करू शकतो.
  13. इथली सैनाही काही कमी नाही हि जगातील दुसरी सर्वात बलाढ्य सैना आहे.
  14. कराची लेक हि सर्वात घातक लेक म्हणून प्रसिध्द आहे.असे म्हटल्या जाते कि जर आपण यातलावापाशी एक तशी थांबलात तर आपण जीवाला गमावून बसाल.आणि ते रास्तही आहे.
  15. सरासरी सर्वच देशात ट्राफिकचे नियम सारखेच असतात पण इथे जे नियम आहेत ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. इथे आपण अस्वच्छ गाडी रस्त्यावर चालवू शकत नाहीत आणि चालवली तर सहा महिने जेल आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.
  16. इथे एक असेही ठिकाण आहे ज्याचे तापमान -50 पेक्षाही कमी असते आणि इथे दुपारी दोन वाजता सूर्य उगवतो आणि तीन वाजता टो लगेच मावळतो.हे ठिकाण पर्यटकांना खूप आवडते.
  17. असे मानले जाते कि रशियात ४० अशी शहरे आहेत जिथे साधारण व्यक्तींना प्रवेशच नाही आणि पर्यटकांनाही तिथे जाण्यासाठी रशिया सरकारकडून स्पेशल परमिशन घ्यावी लागते.रशियात १५ अशेही ठिकाण आहेत जे गुप्त ठेवल्या गेले आहेत जे गुगल मॅपवरही दिसत नाहीत.इथे कोणालाच प्रवेश नाही.
  18. रशियात दरवर्षी जवळपास ५,००,००० लोक नुसते  दारू पिल्यानेच मरतात. आणि यामुळेच इथे मुलींची सख्या मुलांच्या तुलनेत जास्त आहे. इथे असाही एक काळ होता जेंव्हा शिक्षकांना फीस देण्याऐवजी वोडकाचा पॅक पाजवल्या जायचा.
  19. आपण अलास्का बद्दल ऐकले आहे का ? अलास्का हा पूर्वी रशियाचा भाग होता पण १८६६ साली रशियाने अलास्का अमेरिकेला विकला भारतीय रुपयाच्या हिशोबाने तो फक्त 50 करोड रुपयात विकला.
  20. इथे वेगवेगळे ११ टाईम झोन आहेत .यावरूनच आपल्याला एक अंदाज लागेल की हा देश किती मोठा आहे.रशियात एकीकडे सकाळ होते तर दुसरीकडे रात्र होते.
  21. रशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.
  22. आपला विश्वास बसणार नही पण एके काळी रशियांत दाढी ठेवायला कर द्यावा लागायचा.
  23. इथे विवाहित दाम्पत्याला १२ सप्टेंबरला सामुहिक सुट्टी दिल्या जाते.आपल्या कुटुंबासोबत काही वेळ  राहता यावे  यासाठी असे केल्या जाते जर ९ महिन्यानंतर जर दाम्पत्याला बाळ झाले तर त्यांना सरकारकडून पैसे आणि गिफ्ट दिल्या जाते  लोकसंख्या वाढण्यासाठी येथील सरकार प्रोत्साहन देते.
  24. आपल्याला माहित आहे कि दुसरे महायुद्ध संपून खूप काळ लोटला आहे पण तरीही आजपण जपान आणि रशियात संघर्ष आहे.कुरील आईलंडसाठी आजही या दोन देशात संघर्ष होत राहतात.
  25. जगभर इतरांना फुल देणे भाग्याचे आणि आनंदाचे मानल्या जाते पण रशियात आपण कोणाला फुल देऊ नका कारण इथे फुल देणे खूप वाईट मानल्या जाते. इथे कधी गेलात तर हे जरूर लक्षात ठेवा.
  26. इथल्या मुली आधुनिक विचारांच्या आणि खूपच सुन्दर असतात.येतील मुली १४ वर्षातच स्वताची व्हजीनीटी गमावतात.
  27. इथले लॉक जास्तीत जास्त ५५ वर्षापर्यंत जगतात.दारूचे सेवन आणि ड्रग्ज घेणे यामुळे ते कमी वयातच मरतात.
  28. रशिया जगातील पहिला देश आहे ज्याने मानवाला पहिल्यांदा अंतराळात पाठवले.
  29. मोठा देश असल्या कारणाने  हा देश १४ देशांच्या सीमांना लागून आहे .

तर आपल्याला रशियाबद्दल काय वाटते काय आपण कधी रशियाला जाऊ इच्छिता आम्हाला कमेंट मध्ये सांगा आपल्याला हा देश इथली संस्कृती आणि हे रोचक फॅक्ट कसे वाटले नक्की सांगा 

रशियावाद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आमचा खाली लेख वाचा 

Thursday, November 4, 2021

जगातील 10 मानवनिर्मित सर्वात खोल खड्डे (The 10 deepest man-made pits in the world)

गावातील विहीर पाहून जिथे डोळे फिरायला लागतात अशा परीस्थित मी जर आपल्याला सांगितले कि जगात असेही खोल होल खड्डे आहेत जे आपल्याला पाहवले सुद्धा जाणार नाहीत .आणि आणखी एक म्हणजे ते इतके खोल आहेत कि ते पृथ्वीच्या कितीतरी आत खोडून बनवले गेले आहेत. आजच्या पोस्टमध्ये मी आपल्याला सांगणार आहे जगातील 10 मानवनिर्मित सर्वात खोल खड्यांबद्दल तर त्यासाठी हि पोस्ट नक्की वाचा.

जगातले दहा विचित्र आणि दुर्मिळ पक्षी



    10. चुकिकामाटा (chuquicamata)





    चुकिकामाटा ही जगातील उत्खनन करून बनलेली सर्वात मोठी खुली तांब्याची खाण आहे. हे चिलीच्या उत्तरेस, समुद्रसपाटीपासून 2,850 मीटर वर कॅलामाच्या अगदी बाहेर, एंटोफागास्ताच्या ईशान्येस 215 किमी आणि राजधानी सॅंटियागोच्या उत्तरेस 1,240 किमी अंतरावर आहे. 1952 मध्ये फ्लोटेशन आणि स्मेल्टिंग सुविधा स्थापित केल्या गेल्या आणि 1968 मध्ये परिष्करण सुविधांच्या विस्तारामुळे 1970 च्या उत्तरार्धात 500,000 टन वार्षिक तांबे उत्पादन शक्य झाले. 1960 च्या उत्तरार्धात आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस चिलीमध्ये तांब्याचे राष्ट्रीयीकरण झाल्यापासून, अनाकोंडा कॉपरचा पूर्वी भाग असलेली, खाण आता कोडेलको या चिलीच्या राज्य उद्योगाच्या मालकीची झाली आहे. त्याची खोली 850 मीटर युनायटेड स्टेट्समधील उटाहमधील बिंगहॅम कॅनियन खाणीनंतर जगातील दुसरी सर्वात खोल खाण बनते.




    09. बिंघम कॅनियन माईन (blingham candyon mine)







    बिंगहॅम कॅनियन खाण, स्थानिक लोकांमध्ये सामान्यतः केनेकोट कॉपर माईन म्हणून ओळखली जाते, ही एक ओपन-पिट खाण आहे. ही खाण सर्वात मोठी मानवनिर्मित उत्खननातून बनलेली खाण आहे आणि जगात सर्वात खोल खाण आहे. इतिहासातील इतर कोणत्याही खाणीपेक्षा जास्त तांब्याचे उत्पादन इथूनच झाले आहे. 19 दशलक्ष टनांपेक्षा जास्त तांब्याचे उत्पादन इथूनच झाले आहे. ही खाण रिओ टिंटो ग्रुप या ब्रिटीश-ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे. बिंघम कॅनियन खाणीतील तांबे ऑपरेशन्स केनेकोट उटाह कॉपर कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केले जातात. जे खाण, एक केंद्रक संयंत्र, एक स्मेल्टर आणि एक रिफायनरी चालवते.खाणीचे उत्पादन 1906 पासून सुरू आहे, आणि परिणामी 1,210 मीटर खोल 4 किमी रुंद आणि 1,900 एकर क्षेत्रावर हा खड्डा तयार झाला आहे. याला 1966 मध्ये बिंगहॅम कॅनियन ओपन पिट कॉपर माइन या नावाने राष्ट्रीय ऐतिहासिक लँडमार्क म्हणून घोषित केले गेले.






    08. चीक्यू,जपान(chikyu japan)







    वायव्य प्रशांत महासागरात जपानच्या शिमोकिता द्वीपकल्पातील समुद्रतळाच्या खाली 2,111 मीटरपेक्षा खोल खडकाचे नमुने ड्रिलिंग करून चिक्यु जहाजाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला.आजच्या काळातील हे आठव्या क्रमांकाचा सर्वात खोल मानवनिर्मित खड्डा आहे.

    चिक्यु हे अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन जहाज आहे, जे समुद्रसपाटीपासून 10,000 मीटर खाली ड्रिलिंग करण्यास सक्षम आहे. हे आच्छादन, प्लेट बाउंड्री सीसोमोजेनिक झोन आणि खोल बायोस्फीअर यांसारख्या पृथ्वीच्या खोल भागापर्यंत पोहोचण्यासाठी डिझाइन केलेले आहे.समुद्राच्या तळापासून 2,200 मीटर खाली ड्रिलिंग करणे आणि खोलवर गाडलेल्या कोळशाच्या निर्मितीपासून उच्च दर्जाचे नमुने मिळवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.




    07. आईस ओब्जरवेट्री अंटाटिंका (ice cube observatory Antarctica)





    हे जगातील ८व्या क्रमांकाचा पृथ्विवरिल सर्वात खोल मानवनिर्मित खड्डा आहे. जो 2,450 मीटर खोल आहे. तसेतर इथे असे आणखी खड्डे देखिल बनवले गेले आहेत. आणि हे खड्डे संशोधनासाठी केले गेले आहेत .तेथील बर्फ गरम पाण्याचा वापर करून वितळवले आणि हा खोल खड्डा तयार केला अंटार्टीका मधील संशोधनासाठी इथे अनेक प्रयोग केले गेले. इथे जगातील सर्वात मोठी दुर्बीण आहे जीदेखील संशोधनासाठी तयार केल्या गेली आहे.


    06. जिओमेट्रीकल इंगीनीरिंग इंग्लंड (Geothermal Engineering England)







    2018 मध्ये जिओथर्मल इंजिनीअरिंग नावाच्या कंपनीने कॉर्नवॉल, इंग्लंडमध्ये जमिनीखालील गरम खडकांपासून वीज मिळवण्याच्या आशेने ड्रिलिंग सुरू केले. जिओथर्मल पॉवर स्टेशनने कॉर्नवॉल ग्राउंडमध्ये दोन छिद्र पाडल्यासारखे दिसत होते, एक 1.6 मैल आणि दुसरा 2.8 मैल. अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पाने कॉर्नवॉलमध्ये खोदलेल्या सर्वात खोल छिद्राचा विक्रम मोडला. 2019 मध्ये, कंपनीच्या प्रतिनिधींनी दावा केला की ड्रिल 16,000 फूट खोलीपर्यंत पोहोचली आहे, जे जमिनीखाली 3 मैल इतके आहे. तेथे असताना, सुमारे 200 अंश फॅरेनहाइट तापमान अनुभवले गेले.




    05. केटीबी बोअरवेल (KTB borewell)





    1987 आणि 1995 दरम्यान कार्यरत हा जर्मन कॉन्टिनेंटल डीप ड्रिलिंग प्रोग्राम म्हणून ओळखला जाणारा ड्रिलिंग प्रकल्प होता, ज्याचा परिणाम KTB बोरहोल (ज्याचे मूळ जर्मन नावावरून आलेला) झाला. विंडिशेचेनबॅच, बव्हेरियाजवळील KTB बोअरहोल जवळजवळ 30,000 फूट खोलीपर्यंत पोहोचले आहे. 29,859 अचूक मोजमाप आहे आहे. खोदताना 500 अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमानावर त्यांना आढळून आले. ते किती लवकर वाढले याचा परिणाम म्हणून असंख्य वैज्ञानिक शोध घेत होते . उदाहरणार्थ, ड्रिल होलमध्ये द्रव आणि वायूंचा पूर आला, ज्यामुळे डायनॅमिक रॉक तयार झाला, ज्याने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले, ज्यांना मोठ्या प्रमाणावर रूपांतरित खडकाची अपेक्षा होती. KTB बोरहोलचा डेरिक उभा आहे आणि एक प्रमुख जर्मन पर्यटन स्थळ म्हणून काम करतो.





    04.बर्था रॉजर्स (Bertha Rogers hole)






    एकेकाळी संपूर्ण जगातील सर्वात खोल खड्डा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बर्था रॉजर्स या खड्याचे नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यासाठी वाशिता काउंटी, ओक्लाहोमा येथे खोदकाम केल्या गेले. लोन स्टार प्रोड्युसिंग कंपनीने 1972 आणि 74 दरम्यान खोदलेली, विहीर 31,441 फूट इतकी अविश्वसनीय खोली खोदली , 13 एप्रिल 1974 रोजी या खाणीने अधिकृतपणे जागतिक विक्रम प्रस्थापित केला. वितळलेल्या सल्फरच्या खिशामुळे ड्रिल पाईप नष्ट झाल्यानंतर अधिकृतपणे ड्रिलिंग बंद केल्या गेले. आणि तेव्हापासून, बर्था रॉजर्स अमेरिकन मातीतील सर्वात खोल छिद्र आहे.




    03.डीप वाॅटर होरायझन (deepwater horizon)





    तब्बल 560 दशलक्ष डॉलर्समध्ये बांधलेले, ऑफशोअर ड्रिलिंग रिग डीपवॉटर होरायझन बीपी (ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी) ला भाड्याने देण्यात आले आणि मेक्सिकोच्या आखातात ठेवण्यात आले. टेक्सासच्या किनार्‍याजवळील केथली कॅन्यनमध्ये ड्रिलिंग करत असताना, डीपवॉटर होरायझनने 35,050 फूट उंचीवर जगातील सर्वात खोल तेल विहीर ड्रिल करून इतिहास घडवला. रिगने टायबर ऑइल फील्डचा शोध लावला, ज्यामध्ये अंदाजे 6 अब्ज बॅरल तेल आहे. दुर्दैवाने, काही महिन्यांनंतर डीपवॉटर होरायझनने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला जेव्हा एका विनाशकारी आणि प्राणघातक धक्क्याने सागरी इतिहासातील सर्वात मोठी तेल गळती झाली, कथितरित्या 5 दशलक्ष बॅरल किमतीचे तेल मेक्सिकोच्या आखातात टाकले गेले.






    " सावित्रीबाईं " अशी होती पहिली स्त्री शिक्षिका





    02. द सखालीन प्रोजेक्ट- 1 (the Sakhalin project-1)







    डीपवॉटर होरायझनने स्थापित केलेला सर्वात खोल तेल विहिरीचा विक्रम फार काळ टिकला नाही. रशियाच्या सखालिन प्रदेशात सखालिन-1 प्रकल्प आहे, जो सखालिन नावाच्या बेटाच्या किनाऱ्यापासून तेल आणि वायू काढतो. एक्सॉन Neftegas द्वारे संचालित, Odoptu-11 विहीर 28 जानेवारी 2011 रोजी 40,502 फूट खोलवर पोहोचली. फक्त एकोणीस महिन्यांनंतर, जेव्हा Z-44 शायवो विहीर 40,604 फूट खोलीवर पोहोचली. तेव्हा एक्सॉनने आणखी एक जागतिक विक्रम केला. नोव्हेंबर 2017 मध्ये, हा विक्रम तब्बल 49,000 फुटांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला होता. हे एकच छिद्र सैद्धांतिकदृष्ट्या अठरा बुर्ज खलिफापर्यंत असू शकतो! Z-44 शायवो सध्या जगातील सर्वात लांब बोअरहोल आहे, परंतु खऱ्या उभ्या खोलीच्या दृष्टीने सर्वात खोल नाही.



    01. कोला सुपरडीप बोअरहोल (kola superdeep borehole)





    रशिया आणि नॉर्वेच्या सीमेजवळ कोला सुपरडीप बोअरहोल आहे.पृथ्वीच्या कवचापर्यंत शक्य तितक्या खोल ड्रिल करण्याचा युएसएसआरचा प्रयत्न. 1979 मध्ये, वर नमूद केलेल्या बर्था रॉजर्सने स्थापित केलेला विक्रम मोडून ते जगातील सर्वात खोल मानवनिर्मित होल बनले. आणि 1989 मध्ये, जेव्हा तो 40,230 फूट खोलीवर खोदला तेव्हा तो पृथ्वीवरील सर्वात खोल कृत्रिम बिंदू बनला. खर्‍या उभ्या खोलीच्या बाबतीत हे जगातील सर्वात खोल होल आहे, याचा अर्थ असा की ते थेट पृथ्वीवर लंब रेषेत जाते. बोअरहोल 49,000 फुटांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त तापमान आणि चिकट खडकाच्या थरामुळे ड्रिलिंग कठीण झाल्यामुळे काम वेळेपूर्वीच बंद करण्यात आले.


    हे सर्वात खोल 10 होल आहेत हा लेख कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत जा येणाऱ्या काही दिवसात आम्ही आपल्यासाठी आणखी खूप मजेदार आणि रोचक माहिती घेऊन येणार आहोत.आपली साथ आशीच राहूद्या .



    वेनेज़ुएला बद्दल काही रोचक तथ्ये

    Tuesday, November 2, 2021

    " सावित्रीबाईं " अशी होती पहिली स्त्री शिक्षिका ..(savitribai phule the first lady who teacher of the indian womens)




      आज आपण पाहत असाल आजूबाजूला सर्वात शिक्षित कोण मुलगा का मुलगी अर्थातच मुली. या मुलांपेक्षा जास्त शिक्षित आहेत यात शंका मुळातच नाही. पण आजही याचे श्रेय कुणाला द्यावे ? असे म्हणायचे झाले तर फक्त एकाच नाव ते म्हणजे सावित्रीबाई फुले. तुम्ही म्हणाल असं कसं कारण त्यांना महात्मा फुलेंची साथ तर होतीच ना. हे एकदम खर आहे, पण आणखी एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे नवऱ्याच्या प्रत्येक कार्यात साथ देणारी स्त्री अशी स्त्री जी फक्त स्वतः पुरता विचार करत नव्हती. जगाच्या कल्याणासाठी स्वतःला झिजावणारी हि वीरांगना अशा समाजाच्या रूढीपरंपरासोबतही लढत होती ज्या समाजातील स्त्रीला शिकण्याची परवानगी देत नव्हत्या त्या काळी स्त्री शिकू नये यासाठी अनेकजन पुढे यायचे पण स्त्री शिकावी यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. त्या काळी इग्रज सरकार भारतात कार्यरत होते, जे कि शिक्षणाला प्रोस्ताहन देत होत. स्वतःचा काहीसा हेतू साधण्यासाठी का
      होईना इग्रजांनी हि एक गोष्ट मात्र खूपच चांगली केली.


      लग्नापूर्वीची सावित्रीबाई



      सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ ला नायगाव सातारा इथे झाला.

      ज्योतीबासोबत विवाह






      त्या काळी बालविवाह सर्रास होत असत. आणि असेच एक लग्न सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यात झाले.त्यावेळी सावित्रीबींचे वय अवघे 9 वर्ष आणि ज्योतीबांचे वय १२ वर्षे होते.जशी ठिणगीला आगीची गरज आहे तशी सावित्रीबाईला जणू ज्योतिबा नवऱ्याच्या रूपाने भेटले होते.का कोण जाणे हेच जोडपे पुढे जाऊन महिला शिक्षणाला वाचा फोडणार होते.

      फुले नावाचा इतिहास


      सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.


      शिक्षणाची सुरुवात







      सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता.महात्मा फुलेंच्या मावस आत्याला इग्रजी येत असल्याने त्यांनी महात्मा फुलेलाही यासाठी प्रोत्साहित केले. पुढे महात्मा फुलेंनी सावित्राबाईनाही शिक्षण शिकवले

      खऱ्या अर्थाने शिक्षणकार्याला सुरुवात


      या शिक्षणाच्या मदतीनेच १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली.पण लवकरच हि शाळादेखील बंद झाली.१ जानेवारी १८४८ पुण्यातील बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.समाज्याच्या विरोधाला न जुमानता त्या जोडप्याने तब्बल १८ शाळा केवळ ४ वर्षात काढल्या.तत्कालीन भारतातील पहिली मुलींची शाळा हीच होती.सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली

      शिक्षण देण्याव्यतिरिक्त कार्ये


      सती प्रथेला विरोध,स्त्रियांचे केशवेपन थांबवण्यासाठी नाभिक समाजाला प्रबोधन करून घडवलेला संप,भृणहत्या थांबवण्यासाठीचे प्रयत्न, बालहत्या थांबण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना ,पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न असे कित्येक कार्य करण्यास सावित्रीबाई फुले स्वतःच्या जोडीदारासोबत सदैव उभ्या राहिल्या. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

      इ.स. १८९६ साली आलेल्या दुष्काळात त्यांनी समाजात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.या कार्यात त्यांना पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनी मोलाची मदत केली.




      तेजस्वी ज्योत मावळली


      इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ जोर धरत होती अशा काळात हा जीवघेणा रोग घरेच्या घरे आणि गावेच्या गावे उध्वस्त करत पुढे सरकत होता .प्लेग नावाचा हा संसर्गजन्य रोग पुण्यालाही हळूहळू स्वतःच्या वेळख्यात घेत होता.हा रोग संसर्गजन्य आहे हे उशिरा लक्षात आलेल्या इंग्रज सरकारने संभाव्य रुग्णांना स्थानांतरीत करण्याचा सोपा उपाय केला.सावित्रीबाईनी याच

      काळात प्लेगपिढीत लोकांसाठी पुण्याजवळ एक दवाखाना सुरु केला ससाणे माळावर असलेल्या या दवाखान्यात रुंग्न आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या आश्रय देऊ लागल्या.




      आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा बर आपल्याला काय आवडते तेही कमेंट करा म्हणजे पुढच्या लेखात आम्ही त्याबद्दल माहिती लिहू.
      पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र...


      आजही जगातील अनेक शिक्षणसंस्था या सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला वंदन करतात.गूगलने वर दाखविल्याप्रमाणे डूडल प्रकाशित प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला .

      भारत सरकारने सावित्रीबाई याच्या कार्याला जाणून त्यांचे एक टपाल तिकीट १९९८ ला चालू केले.





      सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

      Friday, October 22, 2021

      वेनेज़ुएला बद्दल काही रोचक तथ्ये(Some interesting facts about Venezuela)

      जगामध्ये अनेक प्रकारचे देश आपल्याला आढळतील काही देश स्वतःच्या नावात विविधता ठेवून आहेत तर काही देश स्वतःच्या कामात काही देश स्वतःच्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तक्रार देऊन स्वतःच्या संस्कृतीमुळे परंतु आज आपण देशाबद्दल बोलणार आहोत हा देश एका विचित्र गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे या देशात सुंदरतेला पारावार नाही या देशात अनेक सुंदर ठिकाने आहेत या देशातील स्त्रिया ही अतिशय सुंदर दिसतात आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इथे पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते तरीसुद्धा या देशात अराजकता आणि अशांतता ही सर्वात जास्त आहे जगातील सर्वात अशांत देश म्हणून ओळखला जाणारा हा देश .आज आपण या देशाबद्दल काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग जाणून घेऊयात व्हेनेझुएला देशाबद्दल.

      जगातील 10 मानवनिर्मित सर्वात खोल खड्डे





      ᐅ सर्वात पहिले मी आपल्याला सांगतो की या देशाचं खरं नाव हे व्हेनेज़ुएला नाही तर बोलेरियन रिपब्लिक ऑफ व्हेनेझएला असे आहे.

      हा देश साउथ अमेरिका मध्ये आहे या देशाच्या उत्तरेला कॅरेबियन समुद्र आहे आणि दक्षिणेला ब्राझील देशाची हद्द लागते तसेच पूर्वेला गुयाना आहे आणि पश्चिमेला कोलंबिया देश आहे

      या देशाची एकूण लोकसंख्या आहे तीन करोड ज्यामध्ये तिचा नंबर लोकसंख्येच्या बाबतीत जगात 50 व्या क्रमांकावर आहे

      मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ आठ लाख 82 हजार पन्नास चौरस किलोमीटर आहे

      येथील सर्व लोक शहरात राहतात या देशात तरुणांची संख्या जास्त आहे

      या देशात जनावरांची संख्या जास्त आहे. मित्रांनो जर आपण इथे गेलात तर आपल्याला आजूबाजूला फक्त जंगल आणि जंगलच मिळेल

      शिक्षणासाठी इथे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आपण येथे सकाळ-संध्याकाळ दुपार किंवा रात्री कोण्या कोणत्याही वेळेला शाळेत जाऊ शकतात का कारण येथे शिक्षणासाठी 3-3 शिफ्ट चालतात
      इथल्या लोकांचे असे मानणे आहे की शिक्षण महत्त्वाचे आहे त्यापेक्षा महत्वाची काहीही नाही


      आणखी एक गोष्ट म्हणजे इथे दोनच प्रकारचे ऋतू असतात एक हिवाळा नाहीतर उन्हाळा



      सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पेट्रोलची कमी नाही इथे पेट्रोलच्या अनेक खदानी आहेत इथून ८०टक्के पेट्रोल निर्यात केले जाते
      जेव्हा गोष्ट येथे सौंदर्याची तेव्हा या देशाचे समोर कोणी सुद्धा टिकू शकत नाही कारण या देशाच्या भरपूर स्त्रिया या मिस वर्ल्ड राहिलेल्या आहे तिथल्या मुली सहा वेळा मिस युनिव्हर्स आणि पाच वेळा मिस वर्ल्ड चा पुरस्कार जिंकून आहेत.



      ता ही झाली एक बाजू परंतु त्याचबरोबर या देशात अराजकता आणि अशांतता याचीही काही कमी नाही हा देश सर्वात हिंसक देश म्हणून ओळखला जातो या देशाला जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक ही पदवी मिळालेली आहे या देशात जीवाची किंमत शून्य आहे सामान्य गोष्टी आणि सामान्य बोल चालीवरूनही इथे खूप वेळा गोळीबार चालू होतो



      सोबतच इथे गाडी चालवणे हे तितके सोपे नाही गाडी ऍक्सीडेन्ट होण्यामध्ये हा देश खूप पुढे आहे. इथे प्रति एक लाख मध्ये 36 लोक नुसता एक्सीडेंट मुळे मरतात


      या देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते ज्यात अलुमीनीयम स्टील सिमेंट आणि ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट आर्थिक रित्या हा देश याच गोष्टीवर निर्भर आहे

      येत चिंचा अँडिना मधील सर्वात प्रसिद्ध पेया पैकी एक आहे याला तांदळापासून बनवतात असे म्हणतात की याला पिल्यानंतर तुम्ही कधीच याला विसरू शकणार नाही मित्रांनो जर कधी आपण येथे गेलात तर या ड्रिंकचा आनंद नक्की घ्या.




      तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथे मॅकडोनल ची किंमत सर्वात महागडी आहे जर आपल्याला इथे एक हॅण्डबर्गर ही खायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चार डॉलर द्यावे लागतील जे की खूपच महागडे आहे.

      वेनिझुवेलन बोलिवेर आहे जे की ,७रुपयाच्या बरोबर आहे त्यानुसार आपला रुपया नक्कीच मजबूत आहे नाही का


      इथे खूप साऱ्या गोष्टी भारतातल्या सारख्या आहेत.
      इथेसुद्धा निवडणुकीच्या आधी दारू वाटणे गुन्हा आहे.हो निवडणुकीच्या २१ तासागोदरपासून आपल्याला इथे दारू मिळत नाही. इथल्या सरकारला असे वाटते की दारू पिऊन चुकीचे मत दिल्या जाऊ शकते.

      थे जगात सर्वात जास्त वीज कडकते आपल्याला हे जाणून उशीर होईल की 2015 मध्ये येथे एक लाखापेक्षा जास्त वेळा वीज चमकली होती आणि यामुळे इथे अनेक टुरिस्ट येत असतात.



      आता जाणून घेऊया जगातल्या सर्वात उंच वॉटर फॉल बद्दल हो वॉटर फॉल सुद्धा जीवाला मध्ये स्थित आहे हा एंजल फॉल्स नावाने ओळखला जातो जो की कनिमा नॅशनल पार्क मध्ये स्थित आहे हा कमीत कमी 990 मीटर वरून खाली कोसळतो आणि ते पाहताना तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल या निसर्गरम्य वातावरणात अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतील खरंच धर्तीवरच आहा एक स्वर्गच आहे.





      इथे क्रिसमस वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो व्हेन इज वेलाची राजधानी कण्येकस सर्वांना प्रे करण्यासाठी पोहोचावे लागते तेसुद्धा स्केट करत क्रिसमस च्या दिवशी इथे सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत लोक डाऊन असते.प्रे झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून कॉफी पितात एकदुसर्यांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात

      अर्थातच हा देश अमेरिकेत असल्यामुळे या देशातील बहुतेक लोक हे रोमँटिक असतात इथे कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेमी युगल पाहायला मिळतील
      .


      मित्रांनो 5 जुलै 2011 रोजी व्हेनेझुएलाने स्पेन कडून स्वातंत्र्य मिळवले म्हणजेच जवळपास दहा वर्षांपूर्वी
      व्हेनेझुएला स्वातंत्र्य झाला आहे आणि तितकासा जुना देश नाही. आजच्या आधुनिक जगात हि हा देश तितकासा आधुनिक दिसत नाही.


      आपल्या देशाप्रमाणेच इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे सारे लोक अशी आहेत जी की बिना कामाचे बिना उद्योगधंद्याचे येथे राहतात खूप वेळा इथे या मुद्द्यांवरून विरुद्ध प्रदर्शनेही झालेली आहेत

      खूप मोठ्या कालावधीपर्यंत स्पेनने व्हेनेझुएलावर राज्य केले याचे पडसाद आपल्याला आजही इथे दिसतील इथल्या लोकांचे राहणीमान खाण्याच्या पद्धती खाद्य हे जवळपास स्पॅनिश संस्कृतीशी मेळ खाते. या देशाची भाषा देखील स्पॅनिश आहे आपल्याला हा देश दुसरा स्पॅनिश वाटेल

      कुणाच्या बाबतीत इथले नियम थोडे विवादित आहेत इथे असे समजले जाते की मुलगा 14 वर्षाचा झाला की तो पूर्णपणे विवाह करण्यास सक्षम आहे परंतु मुलींची वय हे 16 वर्षांपेक्षा कमी नसले पाहिजे खरंच विचित्र आहे म्हणजे मुलगा 14 वर्षाचा आणि मुलगी 18 वर्षाची किती विचित्र आहे. यापेक्षा भारतातील विवाह प्रणाली खूप चांगली आहे.


      पूर्ण जगात डाएट कोकला खूप चांगले मानले जाते असे सांगितले जाते की शरीरासाठी चांगले आहे कारण यात शुगर नसते. पण व्हेनेझुएलामध्ये याला चुकीचे मानले जाते हो व्हेनेझुएलामध्येओ डाएट कोकला प्रतिबंध आहे. आपण इथे नॉर्मल कोक पियू शकता. पण डाएट कॉक नाही.


      थे बाळाच्या आईला बाळाचे जन्म प्रमाणपत्र सोबत घेऊन फिरावे लागते हो हे खरे आहे इथे कोणताही बेबी प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी शोपकीपर ला जन्माचे प्रमाणपत्र दाखवावे लागते त्याशिवाय इथे लहान मुलांच्या वस्तू मिळत नाहीत.


      इतकं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे इथे अनेक पक्षी आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या जातीचे पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतील वेगवेगळ्या पक्षांच्या बाबतीत या देशाचा सातवा क्रमांक आहे.




      आपण ऑर्किड फुल पाहिले असेल हे फुल पाहिल्यानंतर प्रत्येकाला हवेहवेसे वाटते पण आपल्याला हे माहीत नसेल की अशा ऑर्किड्स फुलाच्या 25000 प्रजाती आहेत. ज्या व्हेनेझुएलामध्ये मिळतात आपल्याला रस्त्याच्या कडेला हेऑर्किड फुले विकताना लोक भेटतील.हे सगळे खूप स्पेशल असते
      .



      या देशाची राजधानी कराकस (caracas) आहे आणि ही सुद्धा अगदी खास आहे. इसे इथे असे म्हटले जाते कि 9 ते 12 जर गरज नसेल तर बाहेर पडू नये कारण तिथल्या रोडावर खूप मोठी असते भारतातल्या सारखा इथेसुद्धा ट्रॅफिकचा त्रास खूप जास्त आहे. इथे सकाळी आणि संध्याकाळी खूप हेवी ट्रॅफिक असते




      जर आपल्याला नॉनव्हेज आवडते तर आपल्याला या देशात खूप चांगले वाटेल. हो मी असं का बोलतोय कारण इथे जनावरांचे मटण आणि समुद्रातील जीव यान पासून बनवलेले खाद्यपदार्थ आपल्याला इथे सर्रास मिळतील. आणि हे बनवत असताना खूपच चविष्ट असते. असं म्हटलं जातं की जर आपण इथे एकदा जेवण केले तर आपण इथलीच होऊन जाल. इपास इथले राष्ट्रीय खाद्य आहे.

      आपले राष्ट्रीय खाद्य आपल्याला माहीत आहे का?कमेंट मध्ये नक्की कळवा

      अमेरिकेच्या कोणत्याही देशात तुम्ही गेलात तर डान्स करणारे लोक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळतील.
      पण असे म्हटले जाते की इथल्या डान्सर सारखे डान्सर आपल्याला शक्यतो कुठे भेटणार नाहीत. इथे स्ट्रीट परफॉर्मन्सेस देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. येथील लोक प्रत्येक उत्साहात आणि समारंभात आपल्याला नृत्य करताना दिसतील.

      ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सगळे असून देखील इथे गुंडागर्दी सर्वात जास्त आहे इतका सुंदर देश असताना देखील इथे कुणी फिरायला इच्छित नाही पर्यटक हेदेखील या देशाला तितकेसे पसंत करत नाही कारण हा जगातील सगळ्यात असुरक्षित देशांपैकी एक आहे.

      या देशात 23 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यातील राहणीमान खाण्यापिण्याची सवयी आणि कल्चर अलग आहेत ज्यामुळे असे म्हणतात की इथे एका देशात 23 देश बसलेले आहेत. शेवटी हा देश एकच आहे इथे ड्रगचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होतो



      मला असं वाटतं की हा लेख आपल्याला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आपण आमची इतर लेख ही वाचू शकतात तेही आपल्याला नक्की आवडतील अशी मी आशा करतो आपल्याला काही विषयाबद्दल आशंका काही तक्रार किंवा शंका असल्यास आपण आमच्या सोबत संपर्क करू शकता किंवा कमेंट करू शकता आपली कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.


      या पोस्ट आपल्याला आवडतील,









      Tuesday, September 28, 2021

      जगातले दहा विचित्र आणि दुर्मिळ पक्षी (most wired and rare bird species in world)

      कधी आपण असा पक्षी पहिला आहे का जो गाणे म्हणतो.  आपण कधी मोजे घातल्यासारखा दिसणारा पक्षी पाहिला आहे का ? कधी उड्या मारणारा पक्षी पाहिला आहे का ? नाही पाहिला तर चला मग आज आपण अशा विचित्र पक्ष्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही कधीच पाहिले नसतील.

        10. काकापो (KAKAPO)




        काकापो (KAKAPO)
        याला OWL PARROT सुद्धा म्हणतात याला पाहिल्यावर आपल्याला समजेल कि पक्षी जरी घुबडासारखा दिसणारा असला, तरी त्याचा रंग मात्र हिरव्या रंगाचा आहे म्हणजे अगदी पोपटासारखा आहे.न्युझीलंडच्या घनदाट जंगलात आढळणारा हा पक्षी पोपट प्रजातीतला सर्वात वजनी पक्षी आहे. याची लांबी २२-२५ इंच या पक्ष्याचे वैशिष्ट्य असे, कि हा उड्या मारत जातो. उडत नाही ज्यामुळे हा शिकारी प्राण्याच्यासाठी सोपे खाद्य बनतो. ज्यामुळे त्याची संख्या आता खूपच कमी झाली आहे. आजच्या वेळी त्यांची संख्या २११ इतकीच राहिली आहे.

        09.जुनीन ग्रेब  (JUNIN GREBE)




        जुनीन ग्रेब  (JUNIN GREBE)

        या पक्ष्याला JUNIN FLYLESS GREBE असे म्हणतात काळ्या आणि पांढऱ्या रंगासोबत असलेले लाल डोळे पाहिल्यावर आपण त्याला अगदी लवकर ओळखून घेऊ शकाल .हा पक्षी खूपच दुर्मिळ आहे.याचा अंदाज याच गोष्टीवरून लागेल की या पक्ष्यांची संख्या  पूर्ण जगात २५० राहिली आहे पश्चिम मध्य पेरूमध्ये JUNIN तलावात मिळणारा हा पक्षी फक्त JUNIN तलावतच सापडतो . हा पक्षी दुर्मिळ असल्यामुळे पेरू सरकार आता या पक्ष्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.या उपक्रमात शिकारीस बंदी आणि मासेमारीस बंदी असे उपक्रम पेरू सरकार राबवत आहे.

        08. सूपर्ब लायर बर्ड  (SUPERB LYREBIRD)




        सूपर्ब लायर बर्ड  (SUPERB LYREBIRD)

        ऑस्टेलियात आढळणारा हा पक्षी खूप प्रसिद्ध आहे.या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा उत्तम नकल  करतो आणि आणखी एक  गोष्ट म्हणजे हा गाणे म्हणतो पण हा पोपटाच्या प्रजातीतील नाही. हा थोडा-थोडा कबुतरासारखा दिसतो. याला बहुतेक वेळा गाणे म्हणताना पाहिल्या जाते.आणि याच गाण्यांमुळे त्याला धोका निर्माण झाला आहे. गाण्याच्या आवाजाचा पाठलाग करून शिकारी या पक्ष्याला शोधतात.  हा पक्षी आज विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हा इतका दुर्मिळ झाला आहे, कि पक्ष्याचे संरक्षण करणारी संस्था IOC ने या पक्षाला रेड लिस्ट मध्ये जोडले  आहे.

        07.ऑरेंज बेलईड पॅरोट (ORANGE BELLIED PARROT )




        ऑरेंज बेलईड पॅरोट (ORANGE BELLIED PARROT )

        हा पृथ्वीवर असलेला आणखी एक सुंदर पक्षीआहे.पोटापाशी ORANGE रंगाचा भाग असतो त्यामुळे त्याला हे नाव पडले . याची लांबी 20सेमी एवढी असते .हे पोपट प्रजातीतील पक्षी एक-दुसऱ्यांत संवाद साधण्यासाठी BUZZING SOUND चा वापर करतात .तासमानिया मध्ये आढळणारा हा पक्षी हिवाळ्यात दक्षिणी पुर्व ऑस्ट्रेलियात आढळतो.या पक्षाची संख्या आता खूप कमी झाली आहे ,ज्यामुळे या पक्ष्याचे नाव IOC च्या  रेड लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे.या पक्ष्याला पाहायचे असल्यास आपल्याला MUD ILAND ,KING ILAND किंवा VICTORIA LAKE ला भेट द्यावी लागेल.


        06.सुपर्ब  बर्ड ऑफ पॅराडाईस (SUPERB BIRD OF PARADISE )




        सुपर्ब  बर्ड ऑफ पॅराडाईस (SUPERB BIRD OF PARADISE )

        या पक्षाला हे नाव त्याच्या सुंदरतेमुळे दिल्या गेले आहे. हा पक्षी काळया रंगाचा असला तरी याच्या मानेला चमकदार निळा रंग असतो त्यामुळे तो अधिकच सुंदर दिसतो. नाचत असताना तो पूर्णपणे फुगतो मादी पक्ष्याला भुलवण्यासाठी तो असे करतो आणि यामुळे हे पक्षी जास्त प्रसिध्द आहेत. नर मादी यांच्यात खूपच अंतर दिसते. पण मादीच्या तुलनेत नर जास्त आकर्षित दिसतो.   EASTERN INDONESIA PAPUA, PAPUA NEW GUINEA AND EASTERN AUSTRALIA.   मध्ये आढळणारा हा पक्षी अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत आहे .2017 पर्यंत असे समजले जायचे की ही एकच प्रजाती आहे पण 2017 ला याच पक्ष्याच्या तीन प्रजाती आढळून आल्या आहेत.

        05.द ग्रेटर सेज ग्राऊस (THE GREATER SAGE GROUSE)



        द ग्रेटर सेज ग्राऊस (THE GREATER SAGE GROUSE)

        हा पक्षी थोडा विचित्र आहे अस म्हणायला काही हरकत नाही.हा नॉर्थ अमेरिकेत आढळणारा एक दुर्लभ पक्षी आहे. ज्याला  GROUSE BIRD असे सुद्धा उच्चारले जाते. या पक्ष्याचे पंजापासून ते डोक्यापर्यंत सर्व शरीर काट्यांनी भरलेले असते. हलका भुरा आणि काळा दिसणारा हा पक्षी एका विशिष्ठ वैशिष्ट्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे ती म्हणजे या पक्ष्याचा पुढचा भाग ईतर पक्षांपेक्षा अगदी वेगळा असतो. 

        04. क्रिसमस आइसलँड फ्रीगेट बर्ड (CRISMAS ICELAND FRIGATE BIRD)





        क्रिसमस आइसलँड फ्रीगेट बर्ड (CRISMAS ICELAND FRIGATE BIRD)

        दिसायला सुंदर जरी नसला तरी हा पक्षी अजब आहे. आणि हो तितकाच प्रसिध्दही आहे. नरामध्ये समोरच्या बाजूला लाल रंगाचा फुग्यासारखा  दिसणारा भाग असतो. पण मादीमध्ये हाच फुगा पांढरा असतो. याला फुगऊन नर पक्षी मादी पक्षाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.याची लांब चोच याला एक उत्तम शिकारी बनवते. यांचे वजन 1.5 kg पर्यंत असू शकते. याची लांबी 45 इंच इतकी असते. मादी नरापेक्षा मोठी असते. बदलत्या वातावरणमुळे या प्रजातीची संख्या कमी होत आहे.


        03. व्हिक्टोरिया क्राऊन (पिजन) (VICTORIA CROWN PIGEON)




        व्हिक्टोरिया क्राऊन (पिजन) (VICTORIA CROWN PIGEON)

        या पक्ष्याला VICTORIA CROWN PIGEON  मागचे कारण असे आहे , की या पक्ष्यांच्या डोक्यावर दिसणारा तुरा अगदी राणी विक्टोरियाच्या मुकुटासारखा दिसतो. CROWN PIGEON हा  कबुतर प्रजातीतला सर्वात सुंदर पक्षी आहे ज्यामुळे याला KING OF PIGEON (कबूतरांचा राजा) असं संबोधल्या जात. याचे डोळे लाल रंगाचे असतात.निळ्या आणि हलक्या भुऱ्या रंगाच्या पंखांनी हा पक्षी सजलेला असतो. हा पक्षी NEW GUINEA मध्ये आणि इथल्या जवळपासच्या प्रदेशात आढळतो.

        02. ग्रीन पिफऔल (GREEN PEAFOWL)






        ग्रीन पिफऔल (GREEN PEAFOWL)

        GREEN PEAFOWL हा मोर आहे. अचंबित झालात ना की मोर तर आम्हालाही माहीत आहे पण मोर सुद्धा या यादीत आहे. याचे कारण मोरसुध्दा अतिसुंदर पक्षी आहे .त्याचा रंग हिरवा असतो.त्याच्या पंखांची मागणी अगदी मोठया प्रमाणात आहे, ज्यामुळे या पक्ष्याची शिकारही मोठ्या प्रमाणात होते .आजच्या काळात हा पक्षी दक्षिण आशिया आणि उत्तर आशियात आढळतो .मादा मात्र इतकी आकर्षक दिसत नाही जितका नर मोर दिसतो . नर मोराला पिसारा असतो. जो अनेक सुंदर पंखापासून बनलेला असतो .आणखी एक गोष्ट म्हणजे हा पक्षी उडू शकत नाही. मोरामध्ये निळा आणि पांढरा रंग असणाराही मोर आहे. या पक्ष्याची प्रजात आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे .हा पक्षी म्यानमारचा राष्ट्रीय पक्षी आहे.


        1. सेक्रेटरी बर्ड (SECRETERY BIRD)




        सेक्रेटरी बर्ड (SECRETERY BIRD)
        या पक्ष्याला KILLER QUEEN (शिकारी राणी )असेही म्हंटले जाते कारण हा पक्षी किंग कोब्रालाही मारू शकतो . जर लक्षपूर्वक पाहिले, तर आपल्याला या पक्ष्याचे अर्धे शरीर गरुडासारखे आणि अर्धे शरीर करकोच्यासारखे दिसते . याचे शरीर भुऱ्या रंगांचे आणि पंख काळे -पांढरे असतात .सर्व पक्ष्यांत या पक्ष्याचे पाय लांब तर असतच पण सोबतच दिसायलाही विचित्र असतात,असे वाटते जणू या पक्ष्याने पायात मोजे घातले असावेत. ते काहीही असो पण या पक्ष्याला उत्तम शिकारी म्हणता येईल.

        तुम्हाला हे माहीत होते का?कमेंट मध्ये नक्की सांगा..अशा नवनवीन पोस्ट मी आपल्यासाठी पुन्हा घेऊन येणार आहे.धन्यवाद.
        />