Tuesday, September 28, 2021

जगातले दहा विचित्र आणि दुर्मिळ पक्षी (most wired and rare bird species in world)

कधी आपण असा पक्षी पहिला आहे का जो गाणे म्हणतो.  आपण कधी मोजे घातल्यासारखा दिसणारा पक्षी पाहिला आहे का ? कधी उड्या मारणारा पक्षी पाहिला आहे का ? नाही पाहिला तर चला मग आज आपण अशा विचित्र पक्ष्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही कधीच पाहिले नसतील.

    10. काकापो (KAKAPO)




    काकापो (KAKAPO)
    याला OWL PARROT सुद्धा म्हणतात याला पाहिल्यावर आपल्याला समजेल कि पक्षी जरी घुबडासारखा दिसणारा असला, तरी त्याचा रंग मात्र हिरव्या रंगाचा आहे म्हणजे अगदी पोपटासारखा आहे.न्युझीलंडच्या घनदाट जंगलात आढळणारा हा पक्षी पोपट प्रजातीतला सर्वात वजनी पक्षी आहे. याची लांबी २२-२५ इंच या पक्ष्याचे वैशिष्ट्य असे, कि हा उड्या मारत जातो. उडत नाही ज्यामुळे हा शिकारी प्राण्याच्यासाठी सोपे खाद्य बनतो. ज्यामुळे त्याची संख्या आता खूपच कमी झाली आहे. आजच्या वेळी त्यांची संख्या २११ इतकीच राहिली आहे.

    09.जुनीन ग्रेब  (JUNIN GREBE)




    जुनीन ग्रेब  (JUNIN GREBE)

    या पक्ष्याला JUNIN FLYLESS GREBE असे म्हणतात काळ्या आणि पांढऱ्या रंगासोबत असलेले लाल डोळे पाहिल्यावर आपण त्याला अगदी लवकर ओळखून घेऊ शकाल .हा पक्षी खूपच दुर्मिळ आहे.याचा अंदाज याच गोष्टीवरून लागेल की या पक्ष्यांची संख्या  पूर्ण जगात २५० राहिली आहे पश्चिम मध्य पेरूमध्ये JUNIN तलावात मिळणारा हा पक्षी फक्त JUNIN तलावतच सापडतो . हा पक्षी दुर्मिळ असल्यामुळे पेरू सरकार आता या पक्ष्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.या उपक्रमात शिकारीस बंदी आणि मासेमारीस बंदी असे उपक्रम पेरू सरकार राबवत आहे.

    08. सूपर्ब लायर बर्ड  (SUPERB LYREBIRD)




    सूपर्ब लायर बर्ड  (SUPERB LYREBIRD)

    ऑस्टेलियात आढळणारा हा पक्षी खूप प्रसिद्ध आहे.या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा उत्तम नकल  करतो आणि आणखी एक  गोष्ट म्हणजे हा गाणे म्हणतो पण हा पोपटाच्या प्रजातीतील नाही. हा थोडा-थोडा कबुतरासारखा दिसतो. याला बहुतेक वेळा गाणे म्हणताना पाहिल्या जाते.आणि याच गाण्यांमुळे त्याला धोका निर्माण झाला आहे. गाण्याच्या आवाजाचा पाठलाग करून शिकारी या पक्ष्याला शोधतात.  हा पक्षी आज विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हा इतका दुर्मिळ झाला आहे, कि पक्ष्याचे संरक्षण करणारी संस्था IOC ने या पक्षाला रेड लिस्ट मध्ये जोडले  आहे.

    07.ऑरेंज बेलईड पॅरोट (ORANGE BELLIED PARROT )




    ऑरेंज बेलईड पॅरोट (ORANGE BELLIED PARROT )

    हा पृथ्वीवर असलेला आणखी एक सुंदर पक्षीआहे.पोटापाशी ORANGE रंगाचा भाग असतो त्यामुळे त्याला हे नाव पडले . याची लांबी 20सेमी एवढी असते .हे पोपट प्रजातीतील पक्षी एक-दुसऱ्यांत संवाद साधण्यासाठी BUZZING SOUND चा वापर करतात .तासमानिया मध्ये आढळणारा हा पक्षी हिवाळ्यात दक्षिणी पुर्व ऑस्ट्रेलियात आढळतो.या पक्षाची संख्या आता खूप कमी झाली आहे ,ज्यामुळे या पक्ष्याचे नाव IOC च्या  रेड लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे.या पक्ष्याला पाहायचे असल्यास आपल्याला MUD ILAND ,KING ILAND किंवा VICTORIA LAKE ला भेट द्यावी लागेल.


    06.सुपर्ब  बर्ड ऑफ पॅराडाईस (SUPERB BIRD OF PARADISE )




    सुपर्ब  बर्ड ऑफ पॅराडाईस (SUPERB BIRD OF PARADISE )

    या पक्षाला हे नाव त्याच्या सुंदरतेमुळे दिल्या गेले आहे. हा पक्षी काळया रंगाचा असला तरी याच्या मानेला चमकदार निळा रंग असतो त्यामुळे तो अधिकच सुंदर दिसतो. नाचत असताना तो पूर्णपणे फुगतो मादी पक्ष्याला भुलवण्यासाठी तो असे करतो आणि यामुळे हे पक्षी जास्त प्रसिध्द आहेत. नर मादी यांच्यात खूपच अंतर दिसते. पण मादीच्या तुलनेत नर जास्त आकर्षित दिसतो.   EASTERN INDONESIA PAPUA, PAPUA NEW GUINEA AND EASTERN AUSTRALIA.   मध्ये आढळणारा हा पक्षी अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत आहे .2017 पर्यंत असे समजले जायचे की ही एकच प्रजाती आहे पण 2017 ला याच पक्ष्याच्या तीन प्रजाती आढळून आल्या आहेत.

    05.द ग्रेटर सेज ग्राऊस (THE GREATER SAGE GROUSE)



    द ग्रेटर सेज ग्राऊस (THE GREATER SAGE GROUSE)

    हा पक्षी थोडा विचित्र आहे अस म्हणायला काही हरकत नाही.हा नॉर्थ अमेरिकेत आढळणारा एक दुर्लभ पक्षी आहे. ज्याला  GROUSE BIRD असे सुद्धा उच्चारले जाते. या पक्ष्याचे पंजापासून ते डोक्यापर्यंत सर्व शरीर काट्यांनी भरलेले असते. हलका भुरा आणि काळा दिसणारा हा पक्षी एका विशिष्ठ वैशिष्ट्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे ती म्हणजे या पक्ष्याचा पुढचा भाग ईतर पक्षांपेक्षा अगदी वेगळा असतो. 

    04. क्रिसमस आइसलँड फ्रीगेट बर्ड (CRISMAS ICELAND FRIGATE BIRD)





    क्रिसमस आइसलँड फ्रीगेट बर्ड (CRISMAS ICELAND FRIGATE BIRD)

    दिसायला सुंदर जरी नसला तरी हा पक्षी अजब आहे. आणि हो तितकाच प्रसिध्दही आहे. नरामध्ये समोरच्या बाजूला लाल रंगाचा फुग्यासारखा  दिसणारा भाग असतो. पण मादीमध्ये हाच फुगा पांढरा असतो. याला फुगऊन नर पक्षी मादी पक्षाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.याची लांब चोच याला एक उत्तम शिकारी बनवते. यांचे वजन 1.5 kg पर्यंत असू शकते. याची लांबी 45 इंच इतकी असते. मादी नरापेक्षा मोठी असते. बदलत्या वातावरणमुळे या प्रजातीची संख्या कमी होत आहे.


    03. व्हिक्टोरिया क्राऊन (पिजन) (VICTORIA CROWN PIGEON)




    व्हिक्टोरिया क्राऊन (पिजन) (VICTORIA CROWN PIGEON)

    या पक्ष्याला VICTORIA CROWN PIGEON  मागचे कारण असे आहे , की या पक्ष्यांच्या डोक्यावर दिसणारा तुरा अगदी राणी विक्टोरियाच्या मुकुटासारखा दिसतो. CROWN PIGEON हा  कबुतर प्रजातीतला सर्वात सुंदर पक्षी आहे ज्यामुळे याला KING OF PIGEON (कबूतरांचा राजा) असं संबोधल्या जात. याचे डोळे लाल रंगाचे असतात.निळ्या आणि हलक्या भुऱ्या रंगाच्या पंखांनी हा पक्षी सजलेला असतो. हा पक्षी NEW GUINEA मध्ये आणि इथल्या जवळपासच्या प्रदेशात आढळतो.

    02. ग्रीन पिफऔल (GREEN PEAFOWL)






    ग्रीन पिफऔल (GREEN PEAFOWL)

    GREEN PEAFOWL हा मोर आहे. अचंबित झालात ना की मोर तर आम्हालाही माहीत आहे पण मोर सुद्धा या यादीत आहे. याचे कारण मोरसुध्दा अतिसुंदर पक्षी आहे .त्याचा रंग हिरवा असतो.त्याच्या पंखांची मागणी अगदी मोठया प्रमाणात आहे, ज्यामुळे या पक्ष्याची शिकारही मोठ्या प्रमाणात होते .आजच्या काळात हा पक्षी दक्षिण आशिया आणि उत्तर आशियात आढळतो .मादा मात्र इतकी आकर्षक दिसत नाही जितका नर मोर दिसतो . नर मोराला पिसारा असतो. जो अनेक सुंदर पंखापासून बनलेला असतो .आणखी एक गोष्ट म्हणजे हा पक्षी उडू शकत नाही. मोरामध्ये निळा आणि पांढरा रंग असणाराही मोर आहे. या पक्ष्याची प्रजात आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे .हा पक्षी म्यानमारचा राष्ट्रीय पक्षी आहे.


    1. सेक्रेटरी बर्ड (SECRETERY BIRD)




    सेक्रेटरी बर्ड (SECRETERY BIRD)
    या पक्ष्याला KILLER QUEEN (शिकारी राणी )असेही म्हंटले जाते कारण हा पक्षी किंग कोब्रालाही मारू शकतो . जर लक्षपूर्वक पाहिले, तर आपल्याला या पक्ष्याचे अर्धे शरीर गरुडासारखे आणि अर्धे शरीर करकोच्यासारखे दिसते . याचे शरीर भुऱ्या रंगांचे आणि पंख काळे -पांढरे असतात .सर्व पक्ष्यांत या पक्ष्याचे पाय लांब तर असतच पण सोबतच दिसायलाही विचित्र असतात,असे वाटते जणू या पक्ष्याने पायात मोजे घातले असावेत. ते काहीही असो पण या पक्ष्याला उत्तम शिकारी म्हणता येईल.

    तुम्हाला हे माहीत होते का?कमेंट मध्ये नक्की सांगा..अशा नवनवीन पोस्ट मी आपल्यासाठी पुन्हा घेऊन येणार आहे.धन्यवाद.
    />

    0 Please Share a Your Opinion.: